द्रावण डवीकडून उजवीकडं का ढवळतात?

द्रावण डवीकडून उजवीकडं का ढवळतात?



तशी ही पोस्ट केवळ बागेशीच संबंधित आहे असं नाही. हे कुठलंही द्रवरुप मिश्रण ढवळत असताना आपण अनुभवतो. पण जेव्हा आपण बागेला देण्यासाठी द्रवरुप खतं बनवत असतो तेव्हा ते ढवळताना आपण काठी वा अन्य काही नेहमी क्लॉकवाईजच फिरवत असतो किंवा ते तसंच फिरवावं हे सांगितलं जात असतं. तर ते तसंच का फिरवायचं हे आपल्याला कळावं म्हणून ही पोस्ट या समूहावर.


वेस्ट डिकंपोजरचं द्रावण असो की जीवामृत, किंवा कुठलं कीटकनाशकाचं द्रावण असो की सकाळी कपभर दुधात टाकलेली चमचाभार साखर वा नेसकॉफी असो. ती आपण अगदी नकळतच डावीकडून उजवीकडं ढवळतो. हे सारं ढवळणं थांबवुन त्यातली काठी वा चमचा, जे काही असेल ते काढलं तरीही द्रावण बराच वेळ तसंच फिरत रहातं. पण आपण जर द्रावण ऍण्टीक्लॉकवाईज अथवा उजवीकडून डावीकडं फिरवलं तर ते फिरवायला तुलनेनं जास्त जोर लावावा लागतोच पण फिरवणं थांबवल्यावर द्रावण फिरणं थोड्याच वेळात थांबतं.


काय असेल यामागचं कारण?


यामागं आहे भौगोलिक कारण. पृथ्वी दोन गोलार्धात विभागली आहे अन मध्यभागी एक काल्पनिक रेषा जिला विषुववृत्त म्हणतात हे आपण सारेच शाळेत शिकलो आहोत. उत्तर गोलार्ध अन दक्षिण गोलार्ध हे ते दोन गोलार्ध. दोन्हीकडं निर्माण होणारे भवरे, वाऱ्या-वादळाच्या फिरण्याच्या दिशा या वेगवेगळ्या दिशेनं फिरत असतात. यामधल्या शास्त्रात अन कार्यकारणभावात आपण फारसं पडण्याची गरज नाही.


आपला भारत देश येतो उत्तर गोलार्धात. इथं निसर्गतः निर्माण होणारे भवरे, चक्रीवादळं, बेसिनमधे साठलेलं पाणी खालून वाहून जाण्याची पद्धत हे सारं घड्याळाच्या काट्यांप्रमाणं डावीकडून उजवीकडं फिरतं. त्यामुळं त्या दिशेनं जर आपण एखादं जाडसर द्रावण जर फिरवत असु तर त्यासाठी आपल्याला फारसे कष्ट पडत नाहीत. अन द्रावण फिरवायचं थांबल्यावरही ते काही वेळ त्याच दिशेनं फिरत रहातं. परंतु जर आपण तेच जाडसर द्रावण उलट दिशेनं म्हणजे ऍण्टीक्लॉकवाईज फिरवायला गेलो तर त्यासाठी आपल्याला तुलनेनं जास्त जोर लावावा लागेल. अन फिरवणं थांबवताच थोड्याच वेळात ते फिरायचंही थांबेल.


पण म्हणून उलट दिशेनं फिरवल्यास मिसळण्याची क्रिया होत नसेल काय? तर ती नक्कीच होते. पण निसर्गतः असलेले दिशा अन वेग यांची मदत घेतल्यास आपलं काम सोपं होतं. अन दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपण द्रावण क्लॉकवाईज फिरवत असताना जे विद्राव्य पदार्थ म्हणजे उदा. गुळ, डाळीचं पीठ वगैरे सुरुवातीच्या जडत्वामुळं खाली बसलेले असतात ते पाणी फिरताना खालच्या बाजुला जाताना निर्माण होणाऱ्या भवऱ्यामुळं वरच्या दिशेला येतात. वर येत असताना अन पुन्हा खाली जात असताना होणाऱ्या घर्षणामुळं त्यांची पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया लवकर अन वेगानं घडते अन पर्यायानं मिश्रण लवकर तयार होतं.


पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात याच्या बरोबर उलट घडत असतं तर विषुववृत्तावर पाणी सरळ खालच्या दिशेनं वाहून जातं. तिथं पाणी वाहून जात असताना भवरा निर्माण होत नाही.


©राजन लोहगांवकर

®वानस्पत्य

https://vaanaspatya.blogspot.com/

https://www.facebook.com/Vaanaspatya

1 टिप्पणी:

  1. निसर्ग चक्रानुसार कार्य केली असता यश सुलभपणे मिळते आणि कार्य विनासायास होते. अर्थात त्यासाठी लेखात जाणवलेली वैज्ञानिक दृष्टी जोपासायला हवी. 👍🙏

    उत्तर द्याहटवा

झाडांची खतांची भूक

झाडांची खतांची भूक आपण आपल्या बागेला जी खतं देत असतो ती साधारणतः सेंद्रीयच असतात. आपल्याला लागणाऱ्या भाज्या घरी पिकवण्यामागचं कारण रासायनिक ...